Mazi Marathi Tu Marathi Poem : माझी मराठी तू

Mazi Marathi Tu Marathi Poem

माझी मराठी तू

आईच्या कुशीतील पहिल्या उबे सारखी तू,
ओंजळीतल्या अक्षरांत दाटलेली माया तू,
“आई” या शब्दात उमललेलं माझे विश्व तू,
माझ्या श्वासांना अर्थ देणारी, माझी मराठी तू ।। १ ।।

सह्याद्रीच्या कड्यावरची निर्भय गर्जना तू,
महाराज्यांच्या तलवारीची जाज्वल्य ज्वाला तू,
महान संतांच्या अभंगातील कोमल करुणा तू,
हास्य,रौद्र रूप घेणारी, सौम्य गार झुळूक तू.
माझ्या श्वासांना अर्थ देणारी, माझी मराठी तू ।। २ ।।

कधी वारकरी भावनेतली नम्र पणाची प्रार्थना तू,
कधी रणांगणात ठाकलेली जिद्दीची घोषणा तू,
कधी कणखर शब्दांत लोखंडही विरघळते तू,
कधी मायेच्या स्वरांत दगडालाही पाझर फोडते तू,
माझ्या श्वासांना अर्थ देणारी, माझी मराठी तू ।। ३ ।।

आभाळाची व्याप्ती, तरी धरेच्या स्वभावाची तू,
तुझ्या लयींत दडलेला काळाचा अखंड झरा तू,
तू आहेस माझी ओळख, माझं अस्तित्व आहेस तू,
मी असेल अपूर्ण कदाचित, परी जगात परिपूर्ण तू .
माझ्या श्वासांना अर्थ देणारी, माझीच मराठी तू ।। ४ ।।

———– संतोष भरणुके


For Credit Card Apply here:

अधिक आकर्षक लेखांसाठी आमचे अनुसरण करा आणि जग एक्सप्लोर करण्यासाठी कनेक्ट रहा मराठी रंग सोबत. चला संवाद आणि समजूतदार पणाची शक्ती स्वीकारूया.

अधिक कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi

अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स.
➥ Learn What is credit card – Infolips.

Leave a Comment