Marathi kavita on love : मनात साठवलेल्या, प्रेमिका विषयीच्या सर्व संकल्पना आणि प्रेमिका मध्ये कोणते गुण असावे अश्या अपेक्षा. माझी प्रेमिका कशी असावी, तिच्या विषयी कवीच्या भावना काय असाव्यात या सर्व भावनांचे वर्णन या कवितेत केलेला आहे. वाचा तुम्हालाही आवडेल, धन्यवाद !

Marathi Kavita on love : माझ्या मनातील कल्पना
माझ्या मनातील कल्पना, कधी साकार होईल का ।।धृ ।।
स्वप्नी दिसे जे मजला, ते खरं होईल का ?
खरच कोणी इतकं, सुंदर असू शकेल
स्वर्गा मधली परी कधी, धरतीवर उतरेल का
माझ्या मनातील कल्पना, कधी साकार होईल का ।।१ ।।
गोरे गोरे गाल तिचे, असावे ओठ लाल
नाजूक नाजूक बोल तिचे, नाजूक असावी चाल,
काळ्या केसांचे हे जाळे, चेहऱ्यावर पसरेल का
माझ्या मनातील कल्पना, कधी साकार होईल का ।।१ ।।
काळे बदामी डोळे तिचे, असावा रेखीव चेहरा
सध्या भोळ्या राणीचा, मराठमोळा पेहरा,
खांद्यावरचा पदर कधी, वाऱ्यासंग उडेल का
माझ्या मनातील कल्पना, कधी साकार होईल का ।।२ ।।
गोड गोजिरी, लाज लाजरी, नाजूक जशी कली,
हास हसरी, मन मोहरी, नार जशी ती नवेली,
स्मित तिच्या हास्याने, गालावरती खळी पडेल का
माझ्या मनातील कल्पना, कधी साकार होईल का ।।३ ।।
अल्लड नटखट थोडी हटकट, असावी खोडकर,
थोड्या खोड्या मजेच्या चढया असावी मौजमोर,
इतक्या गुणांची कोणी, खरंच माझी होईल का
माझ्या मनातील कल्पना, कधी साकार होईल का ।।४ ।।
धिक कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi
अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स
marathi kavita on love